आज हे अपणा सर्वांसोबत शेअर करतांना litrally speaking, माझे डोळे पाणावलेत मित्रांनो...
फार भयंकर वळणावर उभं केलंय या रोगाने आपल्याला, कालांतराने माणूस माणसाच्याच प्रेतांची शिडी बनवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो कि काय एवढी भयंकर परिस्थिती उद्भवली आहे.
व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने मला काय विचारावं,

"डॉक्टरांना तेवढं विचारून बघा,त्या पेशंट्सपैकी कुणी जाण्याजोगा नाही का?"
खोटं नाही सांगत मित्रांनो,खळक्कन डोळ्यात पाणी आले

या रोगराईत फक्त माणूसच नव्हे तर माणुसकी सुध्दा अखेरच्या घटका मोजत असल्याचे तिथे जाणवले.
तसं तर मागील काही दिवसांपासून येणार्या प्रत्येक फोन कॉलने अगदी हताश व्हायला झालं होतं, कारण त्यात एक आर्जव होता, गहिवरलेल्या आवाजात व्यक्त केलेली एक गरज होती.
कुणाला हॉस्पिटल मध्ये बेड हवाय तर कुणाला व्हेंटिलेटर
कुणाला रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळेना झालंय तर कुणाला ऑक्सिजन सिलिंडर
प्रत्येकाला नकार देतांना मनाला अगणित वेदना होत, त्यात हा आजचा संवाद म्हणजे तर त्यावर केलेली कडीच जणू.

अखेरीस, नाइलाजाने एक गोष्ट नमूद करायलाच हवी कि, आपण एक राष्ट्र म्हणून, एक राज्य म्हणून तसेच एक माणूस म्हणून या संकटास तोंड देण्यास नुसतेच असमर्थ नाही तर पुर्णतः नालायक आहोत.https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Gefaltete Hände" aria-label="Emoji: Gefaltete Hände">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😔" title="Nachdenkliches Gesicht" aria-label="Emoji: Nachdenkliches Gesicht">
You can follow @Nilesh_P_Z.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: