ही थ्रेड आवर्जून वाचा.. अंगावर शहारे येतीलच, ह्याची १००% हमी..

खरंतर हा लेख मी फेसबुकवर खूप आधी लिहिला होता.. इथे पहिल्यांदा टाकतोय..

संघ कसा आणि कशामुळे वाढत गेला ह्याचे उत्तर https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">

संघाच्या तृतीय वर्ष शिबिराच्या वेळेसचा किस्सा आहे .. +
एका स्वयंसेवकाच्या आयुष्यात तृतीय वर्षाचे किती महत्व असते ते संघ माहीत असणाऱ्यांना वेगळे सांगायची गरज नाही. कट्टर स्वयंसेवकाची, प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून देशकार्यासाठी जीवन वेचायची, वृत्ती एव्हाना तयार झालेली असते. कोणाही तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकाकडे +
पाहिल्यास संघाची प्रतिकृती दिसल्यास नवल नाही.

तर.. तृतीय वर्ष शिबीर सुरु होते.. त्यादरम्यान, दोन स्वयंसेवकांमध्ये भांडण सुरु झालं.. खरंतर स्वयंसेवकांमध्ये भांडण हा प्रकार तसा संघाला नवीन.. सुरुवातीला हे भांडण किरकोळ असेल म्हणून दुर्लक्ष केलं गेलं. +
पण नंतर हे भांडण जरा जास्तच वाढलं, तेंव्हा एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला पाठवण्यात आलं..

ते दोघे स्वयंसेवक केरळ मधील कोणूर मधले होते.. त्यांच्यात वाद चालला होता कि, "ह्या शिबिरानंतर त्यांच्या शाखेचा कोण मुख्यशिक्षक होणार" म्हणून.. दोघांनाही त्यात प्रचंड रस होता.. +
आणि त्याच पदामध्ये, दुसर्या कोणत्याही पदामध्ये नाही... तडजोड कोणालाच मान्य नव्हती.. आणि दोघांचा एकमेकांना प्रचंड विरोध होता. प्रसंगी मारामारीसुद्धा झाली होती.

दोघांच्याही बाजू ऐकून काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरलं..

एकाला घरचे लग्नासाठी मुलगी बघत होते. दुसऱ्याचे म्हणणे होते,+
& #39;एक तर पहिला एकुलता एक आणि कमवता. घरची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर. ही जास्तीची जबाबदारी त्याला पेलवणार नाही.& #39;

दुसऱ्याचे लग्न झालेले.. परिस्थिती जरा उत्तम.. पदरात दोन मुले.. पहिल्याचे म्हणणे असे, कि & #39;दुसरा आधीच बर्याच जबाबदाऱ्या सांभाळतोय. घरात दोन लहान मुले. म्हातारे आईबाबा. +
त्याने घरात जास्त लक्ष द्यावे. मुख्य शिक्षकाची जबाबदारी जास्त महत्वाची नाही..& #39;

एकंदरीत असे हे जटील प्रकरण होते.

त्या वृद्ध स्वयंसेवकाला प्रश्न पडला कि, तसं तर दोघांचेही बरोबर, पण दोघांचाही बचाव सुद्धा बरोबर.. त्याचबरोबर दोघे "त्याच" पदाबद्दल तेवढेच आग्रही.. +
मार्ग काही सापडत नव्हता..

त्यापेक्षा सध्या जो कोणी मुख्य शिक्षकाची जबाबदारी सांभाळतोय त्यालाच ती जबाबदारी देणे जास्त योग्य होईल, हा विचार पुढे आला. म्हणून त्यांनी विचारले कि, & #39;सध्याचा त्या शाखेचा मुख्यशिक्षक कोण आहे?& #39;

त्यावर मिळालेले उत्तर वाचणाऱ्याच्या अंगावर +
काटा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही..

उत्तर असं मिळालं कि, ...

"... त्या शाखेच्या मुख्यशिक्षकाचा आठ - दहा दिवसांपूर्वी कम्युनिस्टांनी निर्घृण खून केला होता.. आणि ह्यापुढे & #39;जो कोणी त्या शाखेचा मुख्यशिक्षक होईल त्याचेसुद्धा असेच हाल केले जातील& #39;, अशी पत्रके वाटली होती..

आणि +
आणि त्या भांडणार्या स्वयंसेवकांना एकमेकांचे प्राण वाचवायचे होते...

आणि ती जागासुद्धा रिक्त सोडायची नव्हती.. "

हे खरे होते त्यांच्या भांडणाचे कारण...

कोणूर हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला..

आज केरळात संघाचे संघटन जबरदस्त झाले आहे..
+
अश्या कित्येक ज्ञात अज्ञात स्वयंसेवकांच्या बलिदानाने संघ शक्तिशाली होतोय...

संघाच्या निवासी शिबिरातील एका बौद्धिकात ही माहिती मिळाली.. ऐकताना झालेलो सुन्न अजून तसाच आहे.. देशकार्यासाठी मरण पत्करायला आतुर झालेली उच्चशिक्षित आणि +
उच्च संस्कारांनी प्रेरित अशी लोकं नक्की कोणत्या मातीची असतात?

बास्स.. अजून काही लिहीत नाही.. अजून काही लिहिण्याची गरज आहे?

----------------

पराकोटीच्या त्यागातच स्तिमित करून टाकणाऱ्या उत्कर्षाची बीजे असतात.

#पतत्वेष_कायो_नमस्ते_नमस्ते

© चेतन दीक्षित
You can follow @chetandixit9.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: