टेबल लॅम्प लावून, फॅन किंवा एसी खाली एखाद्या पुस्तकाची जुनी आवृत्ती घेऊन इतिहास डोक्यात उतरेल खरं, पण तो समजून घ्यायला भूगोलाशी नातं जुळवून घ्यावं लागतं! झुंजारमाचीवरून दिसणारा आसमंत.
राजगडाला जशी संजीवनी, सुवेळा, पद्मावती तशीच तोरण्याला झुंजार आणि बुधला माची.
राजगडाला जशी संजीवनी, सुवेळा, पद्मावती तशीच तोरण्याला झुंजार आणि बुधला माची.
यातील झुंजार विस्ताराने छोटी, पण आक्रमक! राजगडाच्या दिशेने निघालेल्या एका बलदंड सोंडेवरील हे नागमोडी बांधकाम म्हणजे एखादी सळसळणारी नागीनच!सळसळत जात जिने एकदम आपला फणा वर उचलावा अशी!या माचीच्या दोन्ही बाजूला खोल कडे आणि डोंगराच्या या धारेवरच दोन टप्प्यांमधील माचीचे बांधकाम.
ज्याला चिलखती बुरुजांनी आणखी भक्कम केले आहे. तिचे वरून दिसणारे दर्शन जितके पोटात धडकी भरवणारे तितकेच तिच्या अंगाखांद्यावरून फिरताना दरारा वाढवणारे. शिवरायांच्या दुर्गाचे हे असले चंडिकेचे रूप पाहिले, की उत्तरेकडील किल्ल्यांचे अस्मानी सौंदर्य त्यापुढे फिके वाटू लागते.