शंभुबाळ...
हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज.
स्वराज्याच्या पहिल्या युवराजांचं तरुणपण जेवढं दिव्य अन पराक्रमी होतं तेवढंच त्यांचं बालपण सुद्धा वादळी होतं.
अगदी लहान वयापासून त्यांनी स्वतःला स्वराज्याला वाहून घेतलं होतं.
लहानपणापासू त्यागाची परिसीमा त्यांनी जगाला दाखवून दिली होती.

शंभूराजे वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून हातात तलवार अन पाठीवर मरण घेऊन धावत सुटले, झुंजत सुटले, जिंकत सुटले.
आम्ही युवराज आहोत म्हणून ते कधीही महालात लोळत पडले नाहीत, ना कधी कसला छंद-फंद केला, ना कधी पित्याकडे कधी कोणता हट्ट केला.
त्यांचा हट्ट एकच होता, फक्त "स्वराज्य."

बाकीची मुले जेव्हा खेळण्यात, दंगा करण्यात मग्न होती त्या वयात माझा युवराज मिर्झाराजाच्या छावणीत स्वराज्यासाठी ओलीस राहिला.
आग्ऱ्यात महाराजांसोबत औरंग्याच्या त्या जीवघेण्या कैदेत राहिला.
मथुरेला बापापासून दूर राहत परक्याच्या घरी वनवास भोगला.

मथुरा ते राजगड हा वैरान प्रवास चालत चालत पार पाडला.
अरे एवढंच नाही तर जिवंतपणी स्वतःचा अंत्यविधी सुद्धा अनुभवला माझ्या छोट्या युवराजाने.
पण पित्याकडे ना कधी कसली तक्रार केली, ना कधी कोणत्या गोष्टीला विरोध केला, ना कधी कसले शल्य बोलून दाखवले.

एवढे वैभव पदरी असून सुद्धा एवढा त्याग माझ्या युवराजाने स्वराज्यासाठी कोवळ्या वयात केला की ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.
अविरत त्याग अन संघर्ष करत राहिला.
एवढी संकटे झेलत सुद्धा कवित्व अन लेखणी सुद्धा जोपासली हे सगळं आजही आपल्याला थक्क करणारच आहे.

त्यांचं भाषाकौशल्य, संस्कृतचा अभ्यास, धर्माबाबतचा अभ्यास, विविध ग्रंथांची रचना, सोबतच युद्धकौशल्य, मर्दानी कला हे सगळं एवढं एवढं अदभुत होत की ते ऐकून अन वाचून आजही काळाची मती सुद्धा गुंग होते,
आम्ही स्वतः हरवून जातो अन त्या सगळ्या गोष्टींचा फक्त हेवा करू शकतो.

खरेच एवढ्या अदभुत गोष्टी शंभूराजांनी जोपासल्या आज त्यातील एक जरी गुण आम्ही अंगिकारला तरी आम्ही या आयुष्यात सगळ्यात वरच्या स्थानावर पोहोचू शकतो.
सदैव स्वराज्यहित जोपासणाऱ्या अन कोवळ्या वयात स्वतःचा जीव स्वराज्यासाठी ओवाळून टाकणाऱ्या त्या धन्य युवराजाला माझा मानाचा मुजरा.