https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="📌" title="Pushpin" aria-label="Emoji: Pushpin">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="📌" title="Pushpin" aria-label="Emoji: Pushpin">
नेता तितका मारू नका!

युती तुटली. शिवसेना, भाजप स्वतंत्र नांदू लागली. (माजी) मुख्यमंत्री फडणवीस अचानक टीकेचे धनी झाले. त्यांच्या पक्षाने यापूर्वी काय केले, कोणी कसे ट्रोल केले, आयटी सेलचे काम काय यामध्ये मला पडायचे नाही. मी राजकारणाकडे पाहताना, स्वतःच्या नजरेला.. (१/२५)
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable=https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="📌" title="Pushpin" aria-label="Emoji: Pushpin">नेता तितका मारू नका!युती तुटली. शिवसेना, भाजप स्वतंत्र नांदू लागली. (माजी) मुख्यमंत्री फडणवीस अचानक टीकेचे धनी झाले. त्यांच्या पक्षाने यापूर्वी काय केले, कोणी कसे ट्रोल केले, आयटी सेलचे काम काय यामध्ये मला पडायचे नाही. मी राजकारणाकडे पाहताना, स्वतःच्या नजरेला.. (१/२५)" title="https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="📌" title="Pushpin" aria-label="Emoji: Pushpin">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="📌" title="Pushpin" aria-label="Emoji: Pushpin">नेता तितका मारू नका!युती तुटली. शिवसेना, भाजप स्वतंत्र नांदू लागली. (माजी) मुख्यमंत्री फडणवीस अचानक टीकेचे धनी झाले. त्यांच्या पक्षाने यापूर्वी काय केले, कोणी कसे ट्रोल केले, आयटी सेलचे काम काय यामध्ये मला पडायचे नाही. मी राजकारणाकडे पाहताना, स्वतःच्या नजरेला.. (१/२५)" class="img-responsive" style="max-width:100%;"/>
पक्षाची विचारधारा, पक्षप्रमुख, नेते आणि कार्यकर्ते अशा चार विभागात स्वतंत्रपणे विभागून घेतलंय. यामुळे वरील चारही विभागात वैयक्तिक भाष्य करण्याचा नैतिक अधिकार आपोआप प्राप्त होतो. असो! आज दोन नेत्यांबद्दल & #39;जे मनी ते ओठी& #39; लिहितोय. दोघांच्या वयात फरक आहे. अनुभवात फरक (२/२५)
आहे. मात्र दोघांनीही विरोधी पक्षनेतेपद आणि मुख्यमंत्री पद भूषवली आहेत. आणि दोघेही शिवसेनेच्या & #39;ठरवून& #39; केलेल्या अत्यंत घाणेरड्या दर्जाच्या, द्वेषपूर्ण ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहेत. त्यांचं नाव आहे, दोन्ही माजी मुख्यमंत्री, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस!

तसे पाहायला (३/२५)
गेल्यास एखाद्याला चिथावणारी नावं ठेऊन त्याच खच्चीकरण करण्याचं & #39;सक्रिय& #39; मूळ शिवसेनेचं! नावावरून, शरीरावरुन आणि आदी बाबींवरून एक चीड आणणारं टोपण नाव ठेवायचं आणि त्याच नावानं सातत्याने हिणवण्यास सुरुवात करा अशी ती स्ट्रॅटेजी. राहुल गांधींना & #39;पप्पू& #39; बनवण्यात हीच स्ट्रॅटेजी (४/२५)
मारक ठरली. आणि फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा. तर माझ्या लेख व थ्रेडचा विषय मी & #39;नेता तितका मारू नका& #39; या चार शब्दात स्पष्ट केला. मी या दोन्ही नेत्यांचा & #39;भक्त& #39; नाही. त्यांचा पक्ष कोणता याचा मला काडीमात्र फरक पडत नाही. राहुल गांधी असो, शरद पवार (५/२५)
असो किंवा उद्धव.. सॉरी! नाही नाही उद्धव ठाकरे नाही. मला वाटत नाही अजून उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख किंवा मुख्यमंत्री म्हणून स्वतःला & #39;स्वतंत्रपणे& #39; सिद्ध केलेलं नाही. त्यांच्या निर्णयात नार्वेकरांच्या कपटनीतीचा वास येत राहतो. अलीकडे त्यात पीआर कंपनीची भर! तर ते सोडून (६/२५)
इतर प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे आहेच की.. या सर्व मांदियाळीत नारायण राणे यांच्यावर माणूस म्हणून प्रेम आहे तर फडणवीसांच्या निमित्तानं तरुण सक्षम नेता मिळावा अशी भावना मागच्या सरकारदरम्यान निर्माण झाली. इतकेच!

सध्या फडणवीसांवर जोरदार टीका सुरु आहे. अनेक नावांनी (७/२५)
त्यांची हेटाळणी केली जात आहे. त्यांनी काय केले, मध्यंतरी त्यांना & #39;ग& #39;ची बाधा नडली याबाबत काहीही भाष्य करायचे नाही. थ्रेडचा तो विषय नाही. फडणवीस हा नेता तळागाळातून आलेला आहे. तरुण महापौर ते तरुण मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास आहे. प्रत्येक निवडणूक त्यांनी लढवली आहे.अभ्यासू (८/२५)
आमदार म्हणून त्यांची विधानसभेत ओळख आहे. होती. अगदी अर्थसंकल्पापासून, ऑनफिल्ड असलेल्या विविध प्रश्नांची जाण त्या व्यक्तीत दिसून आली. स्वतः वकिलीचा अभ्यास. त्यामुळे कायद्याची माहिती त्यांच्याकडे होती. पाच वर्षात राज्यातील भाजपचे राजकारण & #39;देवेंद्र& #39; नावाभोवती फिरते ही कुशल (९/२५)
राजकारण्याची पावतीच म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय टीका निश्चित व्हावी. योग्य वेळेस,मी देखील करतो. मात्र अंगविक्षेप नावं ठेऊन एखाद्याला जिवंत मारणं फार वाईट. त्यामुळे फडणवीस कोडगे होतील, मात्र त्यांच्यातील & #39;नेता& #39; मरेल. आणि हे राज्यासाठी हिताचे नाही. कारण असाच (१०/२५)
एक लोकनेता काही सेनेने वर्षांपूर्वी मारला. अर्थात तो अद्याप जिवंत कसा या प्रश्नानं आजही शिवसेनेच्या त्या कपटनितीला कापरं भरतं.

नारायण राणे! राज्याच्या राजकारणात या नावाला विसरून चालणार नाही. किंबहुना या नावाचं कार्य ते नाव विसरू देणार नाही. बाळासाहेबांच्या कृपेमुळेच (११/२५)
राणेंना मोठी पदं मिळाली असं काही महाभागांचे म्हणणे. मान्य! बाळासाहेबांनी राणेना मुख्यमंत्री केले. मग बाळासाहेबांच्या निवडीवर & #39;नावाला कट्टर& #39; शिवसैनिकांना आक्षेप आहे काय? बाळासाहेब कोणालाही पदं वाटत फिरायचे का? आजवरचे सर्व शिवसेनेचे नेते (उद्धव ठाकरेही) & #39;कोणीही& #39; आहेत का? एक (१२/२५)
व्यक्ती शाखाप्रमुख तर मुख्यमंत्री हा प्रवास करतो तेव्हा त्याचा लोकसंपर्क किती दांडगा आहे इतका साधा विचार मेंदू गुडघ्यात घेऊन फिरणारे करत नसतील काय? शिवसेनेतून मोठे मोठे नेते बाहेर पडले. भुजबळांपासून, राज ठाकरे! मात्र सर्वाधिक द्वेषपूर्ण हेटाळणी राणेंच्या वाटेला आली. आपल्या(१३/२५)
उत्कर्षाच्या वाटेत आडवे आलेल्या व्यक्तीला & #39;आडवे& #39; करावं हा छुपा धडा त्यावेळी सेना वरिष्ठांनी देऊ केला. कदाचित शिवसेनेतील नारायण राणे दिघे साहेबांसारखे & #39;देवमाणूस& #39; होऊ शकले असते, जर सन्माननीय धर्मवीर आनंद दिघेंप्रमाणे त्यांनाही त्याचवेळी मृत्यूने कवटाळले असते. अर्थात त्या (१४/२५)
मृत्यूने कवटाळण्याचे कारण, ते कारण निर्माण करणारे & #39;कारण& #39; सेम असते तर... दिघे साहेबांचा मृत्यू मात्र दंतकथा बनून राहिली हि शोकांतिकाच! तर राणे योग्यवेळी सेनेतून बाहेर पडले. आणि जीवानिशी वाचले.

माझ्या ओळखीतील कट्टर शिवसैनिक मात्र & #39;दादांवर& #39; आजही प्रेम करणारे एक (१५/२५)
गृहस्थ सांगतात, & #39;दादांना बाळासाहेबांनी बाहेर कडेने हे अशक्यच. बाळासाहेबांच्या गोटातील सर्वात विश्वासू शिलेदारांपैकी एक नाव नारायण राणे होते. मातोश्रीवर कुठल्याही परवानगीशिवाय आतबाहेर येण्याची मुभा या नेत्याला होती. शिवसेनेत, विशेषतः बाळासाहेबांच्या मनात राणेंचे वजन वाढले (१६/२५)
होते. तेव्हा त्या असूयेने राणेंविरोधी गट आपोआप तयार झाला. या गटाच्या & #39;राजाचा& #39; राज्याभिषेक तर झाला होता. मात्र राज्यकारभार & #39;अण्णाजी दत्तो& #39; हाकत होते. हा गट & #39;एक वार दोन तुकडे& #39; करणारा नव्हता. त्यांनी & #39;सावकाश पण शक्य तितकं खच्चीकरण& #39; हे सूत्र अवलंबले. बाळासाहेबांच्या (१७/२५)
मनातून राणेंना उतरवण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र तो असफल होताच, सेनेच्या इतर बड्या नेत्यांना आपल्या राजाच्या गोटात खेचण्याचे कार्य सुरु झाले. आणि यशस्वी देखील.. राणेंचा चढता आलेख आपल्या & #39;राजाच्या& #39; पर्यायाने आपल्या विकासाला खीळ बसवेल ही अनामिक भीती या अण्णाजी दत्तोला (१८/२५)
छळत होती. बाळासाहेबांनी राणेंना स्वतः पाचारण करून शिवसेना सोडण्याची योग्य वेळ आहे असे सांगितल्याचे आतल्या गोटातून कळले होते.& #39; या स्पष्टोक्तीवरून नारायण राणेंनी शिवसेनेतून बाहेर जावे यासाठी जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेल्या मार्गाचा अंदाज येऊन जातो.

अनेकांचा आरोप (१९/२५)
आहे की नारायण राणे शिवसेनेत गेले, सेनेची सत्ता गेली. काँग्रेसमध्ये गेले.. वगैरे. तर नारायण राणे शिवसेनेतील प्रवास किती वर्षांचा आहे याचा सर्वप्रथम अनेकांनी अभ्यास करावा. भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. राज्यात (२०/२५)
झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरात शिवसेना-भाजप युती सरकारात राणे पहिल्यांदा महसूल मंत्री झाले. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. बाळासाहेबांनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. मग तेव्हा दुसरा (२१/२५)
नेता बाळासाहेबांसमोर पर्याय म्हणून नव्हता का? खरी गंमत म्हणजे एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा राणेंची विरोधी पक्षनेतेपद अधिक गाजले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अधिवेशन काळात राणेंची धास्ती असायची. या काळातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना राणेंनी दिलेल्या (२२/२५)
वागणुकीबद्दल विचारावे... त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया & #39;तुमचा& #39; गैरसमज पुसणाऱ्या असतील. हा इतिहास आहे आणि वर्तमान देखील!

कार्यध्यक्षपद ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे आले. आणि नारायण राणे व राज ठाकरे आपोआप शिवसेनेतून & #39;शरीराने& #39; बाहेर पडले. त्यावेळी एकत्र येऊन काहीतरी (२३/२५)
कराव असा त्यांचा कयास होता. मात्र राणे काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले. त्यांच्या कार्याचा धडाका पाहून & #39;मुख्यमंत्री& #39; पदाची ऑफर होती. मात्र राणेंचा आक्रमकपणा काँग्रेस पक्षश्रेष्टींना होता. राणे भारी पडणार, तिथे रिमोट कंट्रोल (२४/२५)
चालणार नाही हे लक्षात घेत त्यांना झुलवत ठेवण्यात आले. त्यांचा आक्रमकपण सुटला नव्हता. जवळपास १३-१४ वर्षांची आक्रमक कारकीर्द कायम ठेवत राणे काँग्रेसमधून बाहेर पडले.

(थ्रेड संपतोय. त्यामुळे उर्वरित लिखाण या फोटोत आहे.) (२५/२५)
You can follow @RaneSays.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: