बाबासाहेबांनी सातासमुद्रापलीकडे लंडनला असताना रमा मातेला लिहिलेलं पत्र..."रमा तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर......"तू मला मनसाथी म्हणून मिळाली नसतीस तर......तर काय झालं असतं माझं रमा..& #39;केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला कधीच सोडून गेली असती-----
अर्धपोटी राहणे,
गोवऱ्या वेचायला जाणे, स्वयंपाकासाठी इंधन गोळा करणे, घराला ठिगळ लावत राहणे, फाटक्या वस्त्रांना शिवत राहणे....एवढ्याच काड्यांच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच धान्य, एवढेच तेल मीठ पुरले पाहिजे...हे सगळे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर...
माझे मन अक्षरशः फाटून गेले असते, माझ्या जिद्दीला कधीच तडे गेले असते, मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती, माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता...
"माझा अस्पृश्य समाज अगदी कायमचाच गुलामीच्या जखडबंद बेड्यात खितपत पडून राहिला असता".....
रमा माझ्या जीवनाचा सगळा सुरच बेसूर झाला असता,
सगळीच मोडतोड झाली असती..."मी कदाचित खुरटी वनस्पती झालो असतो"..."जप स्वतःला जशी जपतेस मला" यावर रमाईच उत्तर आलं पत्राद्वारेच,"आता कसलीच तक्रार नाही साहेब,
या सावलीनं वादळाला वचन दिलय
"कायम सोबत करायचं वचन"
आता माघार नाही......
"ही आहे त्यागाधिष्टीत प्रीती"
जगावेगळी प्रीती आणि जगावेगळी जोडी...
मायबाप दोघांच्याही त्यागमय जीवनास कोटी कोटी अभिवादन
दोघांचाही आदर्श सर्वांपुढे चिरंतन राहो
माता रमाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना विनम्र अभिवादनhttps://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏🏼" title="Folded hands (medium light skin tone)" aria-label="Emoji: Folded hands (medium light skin tone)">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="💐" title="Bouquet" aria-label="Emoji: Bouquet">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏🏼" title="Folded hands (medium light skin tone)" aria-label="Emoji: Folded hands (medium light skin tone)">
You can follow @Piyuuu8888.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: