महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान असलेल्या स्थलांतरित मजुरांनी स्वगृही जाण्याचा आग्रह धरल्यानंतर #मविआ सरकारने CM फंडातून त्यांच्या प्रवासाची सोय केली. @myogiadityanath जी आज या मजुरांना क्वारंटाईन करण्याची, त्यांची अधिकाधिक टेस्ट करण्याची & त्यांना रोजगार देण्याची खरी गरज आहे. https://twitter.com/myogioffice/status/1264530831147556866">https://twitter.com/myogioffi...
अतिथी देवो भव: या नात्याने त्यांची पूर्ण काळजी घेतल्यानेच महाराष्ट्राचं कौतुक करणारे व्हिडिओ या मजुरांनी पोस्ट केल्याचे आपणही पाहिले असेल. नसेल पाहिले तर तेही पाठवून देतो. पण याच मजुरांवर आपण औषध फवारून जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिल्याचं सगळ्या जगाने पाहिलं.
त्यांची आपणास एवढीच काळजी आहे तर पोटासाठी त्यांना वर्षांनुवर्षे महाराष्ट्रात जाण्याची वेळ का व कोणी आणली? सुरवातीला त्यांना स्वगृही येऊ देण्यास कोणी मज्जाव केला? & या मजुरांसाठी रेल्वे सुरू करण्याची महाराष्ट्र सरकारची विनंती मान्य न करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आपण गप्प का होता?
या प्रश्नांची उत्तरंही द्या. पण असो. माझी #मविआ सरकारला विनंती आहे, हे मजूर पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर त्यांची नोंदणी, पोलीस रेकाॅर्ड व आरोग्य चाचणी या सर्व गोष्टी करून घ्याव्यात. कारण @myogiadityanath जींच्या राज्यात याचा काहीच संबंध येत नाही,हे आपण पहातच आहोत.
शेवटी महाराष्ट्राचं मन खूप मोठं आहे हे आम्ही वेळोवेळी दाखवून दिलंच आहे. आपल्यालाही विनंती करतो, महाराष्ट्रावर नाहक आगपाखड करण्यापेक्षा जमलं तर आपणही अधिकाधिक टेस्ट करुन UPतल्या नागरिकांची काळजी घ्या.