फेसबुक आणि जिओची एक डील झाली, दुर्दैवाने त्याबद्दल जास्त लिहिलं वाचलं गेलं नाही. पण सोप्या शब्दात मांडणी व्हायला हवीच म्हणून हा #थ्रेड

#facebookjiodeal
फेसबुक आणि जिओ जे काय आज एकत्र आलेले मित्र नाहीत. तुमच्या लक्षात असेल तर आपण एक ट्रेंड केला होता चार-पाच वर्षांपूर्वी, फेसबुक तेंव्हा इंटरनेट.ऑर्ग नावाच्या एका उपक्रम अंतर्गत काही मोजक्या वेबसाईट्स चा गुच्छ जिओ सोबत फुकटात देणार होतं.
त्या गोष्टीला आपण सर्वांनी इतका कडाडून विरोध केला कि TRAI ला त्यावर बंदी घालावी लागली आणि फेसबुकलाही आपलं पाऊल मागे घ्यावं लागलं. तरीही काही गरीब देशांमध्ये त्यांनी हा अजेंडा पुढे रेटलाच. तेंव्हा फेसबुकने नुकतंच (फेब २०१४) व्हॉट्सअप १९ बिलियन डॉलर्स ला विकत घेतलं होतं.
आज त्या नंतर फास्ट फॉरवर्ड ४ वर्षांनी फेसबुकने रिलायन्स समूहाच्या सर्वात लाडक्या जिओ या कंपनीमध्ये ५.७ बिलियन डॉलर्स (४३५७४ कोटी रुपये) गुंतवून त्या कंपनीची ९.९९% मालकी मिळवली.
व्हॉट्सअप नंतर फेसबुक ने केलेली हि सर्वात मोठी गुंतवणूक. हा व्यवहार पूर्ण होताच जिओ चे मूल्य ६० बिलियन डॉलर्स (४,५७,९०८ कोटी रुपये) झालं आहे.
आता हे वरवर पाहायला गेल्यास असं दिसतं कि जिओचे वापरकर्ते आणि व्हॉट्सअप वापरकर्ते यांचे एकत्रीकरण करून डिजिटल पेमेंट्स सेवा सुरु करून त्याचा फायदा दोन्ही कंपनींना व्हावा असा हेतू असेल. पण तसं नाहीये.
भारताच्या ७०० बिलियन डॉलर्स किरकोळ किराणा बाजारपेठेवर डोळा ठेवून विचारपूर्वक घेतलेले हे निर्णय आहेत. रिलायन्स आधीच भारतात ७००० जिओ मार्ट मार्फत छोट्या मोठ्या शहरात कार्यरत आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअप ह्यांच्या मार्फत डिजिटल व्यवहार सुरु करून कान्याकोपऱ्यातील वापरकर्त्यापर्यंत पोहोचून या बाजारपेठेवर वर्चस्व मिळवावे हा उद्देश या गुंतवणुकीमागे आहे. यातनं मोठी स्पर्धा उभी राहणार आहे.
आणि ती इतर कुठल्या देशातील रिटेल व्यावसायिक कंपनीसोबत नसून, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सोबत आहे. कारण ते हि भारतासाठी याच प्रकारच्या व्यापार प्रारूपावर गेला बराच काळ काम करत आहेत.
"फिजीटल" हा नवीन शब्द या निमित्ताने रुळला जाईल. फिजिकल डिजिटल या दोन्ही शब्दांची संधी होऊन बनलेला हा शब्द. कुठल्याही प्लॅटफॉर्म साठी जोडला जाणारा प्रत्येक नवीन वापरकर्ता आधीच्या आणि भविष्यातील वापरकर्त्यांसाठी मोठाल्या मूल्याची भर घालत असतो
तसंच या प्लॅटफॉर्म्सचं सुद्धा आहे, हेसुद्धा लोकांच्या सवयीचा भाग होणारच आहेत जसं आता नेटफ्लिक्स ऍमेझॉन प्राईम झाले आहे. तर जेंव्हा लोकांना सवय लागेल तेंव्हा आघाडीवर असलेला प्लॅटफॉर्म हि स्पर्धा जिंकेल.
आणि या स्पर्धेचं तिकीट म्हणून फेसबुकने इतकी गडगंज गुंतवणूक जिओ मध्ये केलेली आहे.

https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👍" title="Thumbs up" aria-label="Emoji: Thumbs up">
You can follow @hpsonar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: